मुख्य बातमी

गारपिटीचा पुन्हा तडाखा

21-04-2014 12:21:59 AM

उस्मानाबाद तालुक्याला फटका Ÿ। गुंजेवाडी, कौडगाव, वडगाव काटीत घरांवरील पत्रे उडाले । अनेकांचे संसार उघड्यावर, फळबागांचे नुकसान Ÿ। शेतक-यांवर पुन्हा संकट

उस्मानाबाद/लातूर : मागील महिन्यात मराठवाड्यात सर्वत्र गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतक-यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावून नेला होता. त्या तडाख्यातून शेतकरी अजून सावरला नाही, तोच उस्मानाबाद तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह गारपीट झाली. त्यामुळे तालुक्यातील गुंजेवाडी, कौडगाव, वडगाव काटी, खानापूर भागातील घरांचे पत्रे उडाले. तसेच विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांवर पुन्हा संकट...

देश-विदेश

‘नमो’ आणि ‘रागां’ जगभरात लोकप्रिय

20-04-2014 08:44:12 PM

तिस-या क्रमांकावर केजरीवालांचेही आकर्षण

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनी इंटरनेट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असतानाच, देशातील दोन बड्या नेत्यांबद्दल इंग्रजी आणि हिंदी वगळता परदेशी भाषांमध्येही चर्चा होत असल्याचे एका सर्वेक्षणाआधारे समोर आले आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर परदेशी भाषांतही मोठे फॅनफॉलोर्इंग आहे. मोदींबाबत सर्वाधिक चर्चा इंग्रजीपाठोपाठ पोर्तुगीज भाषेत होते, तर राहुल यांच्याबद्दल इंडोनेशियन आणि इटालियन भाषांमध्ये चर्चा केली जाते.सोशल मीडियावरील मजकुराचे विश्लेषण करणा-या ‘मेरुकी’ या संस्थेने केलेल्या...

Sports

मॅक्सवेलचा तुफानी मारा

21-04-2014 01:01:51 AM

राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का, मिलरचीही फटकेबाजी

शारजाह : मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी आणि डेव्हीड मिलरचे वेगवान अर्धशतक याच्या जोरावर किंग्ज पंजाब एलेव्हनने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवत आठ चेंडू राखून शानदार विजय मिळविला. मिलरने सहा षटकारांच्या जोरावर केवळ १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून विजयात मोलाचा वाटा उचलला.
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज एलेव्हन यांच्यात सामना रंगला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर तब्बल १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या पंजाबच्या मॅक्सवेल आणि मिलरने पुन्हा तुफानी मारा...

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हे श्रीमंतभोगी !

20-04-2014 08:56:34 PM

खेड : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. बापजाद्याची संघटनेची श्रीमंती त्यांना आपोआप मिळाली आहे. म्हणजे श्रीमंतभोगी कोण आहे ते तुम्हीच ठरवा. माझे वडील राजकारणात नव्हते. मी स्वत: निर्माण केले आहे. उद्धव ठाकरेंचे स्वकर्तृत्व शून्य आहे. हे ते विसरले आहेत. म्हणून त्यांचे आता नामकरण केले पाहिजे. उद्धव ठाकरे ऐवजी त्यांना उद्धट ठाकरे म्हणण्यात यावे, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांकडूनच करण्यात आली, अशा रोखठोक शब्दांत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान...

Photo Gallery

👍 आपला अभिप्राय/प्रतिक्रिया

E-Paper

संपादकीय

गायब मतदारांचा शोध

महाराष्ट्रात १६ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० आणि १७ एप्रिल रोजी २९ मतदारसंघांत मतदान झाले. या वर्षी झालेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मागील दोन दशकांत झालेल्या पाच निवडणुकांतील मतदानापेक्षा या वर्षी मतदानात लक्षणीय वाढ झाली आहे. ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत होणारे मतदान या वर्षी वाढून ६२ टक्क्यांवर गेले आहे. या वर्षी निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये प्रभावीपणे जागृती निर्माण केली. मतदारांना घरपोच तपशीलवार पोल चिटचे वाटप केले....

Poll

मनोरंजन

कच्चे बच्चे

स्टारपुत्र, स्टारकन्या असे टॅग घेऊन मोठ्या पडद्यावर अवतरले खरे; पण त्यांची जादू इथे बिलकूल चालली नाही. आई-वडील बॉलिवूडचे सुपरस्टार असताना ते मात्र सुपरफ्लॉप ठरले. अशाच काही बच्च्यांविषयी..
शत्रुघ्न सिन्हा-लव सिन्हा
शॉटगन शत्रुघ्न सिन्हाची इंडस्टड्ढीत कमालीची क्रेझ होती. शत्रुघ्न यांच्या लव आणि कुश या दोन जुळ्या मुलांपैकी लवने अभिनेता म्हणून काम केले आहे. लव पहिल्यांदा ‘सदियां’ (२०१०) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसला होता. परंतु त्याच्या करिअरचे रॉकेट...

वाचा सप्तरंगमध्ये

फॅन्ड्री क्या हैैं ?

मराठी भाषेत अशा पद्धतीचे चित्रपट आजपर्यंत झाले नाहीत. कारण हा विषय ग्रामीण भागात सहज रोजच लोकांच्या, प्रेक्षकांच्या नजरेला पडणारा आहे. हे जगणे कैकाडी समाजाला रोजचेच आहे. ही
अवहेलना आणि उपेक्षा पिढ्यान् पिढ्या त्यांच्या वाट्याला आलेली आहे. याच जगण्यावर आणि या...